माणसाचे मशीन

हे न थकणारे मशीन
किरणातूनच पसरत जाणारे संकटाचे सावट
थेट चादारीच्या आतपर्यंत
उसंतच घेऊ देत नाही जगण्यासाठी
असे हजारो मार्ग नाउमेद करणारे
सकाळीच प्रश्न पडलेले समोर हात पसरवून
चहापाण्याचे
पोटभर खाण्याचे
पोराटोरांच्या सुखांचे
आजारपणाचे
आणि असंख्य गुंतावळीचे
 जगण्यातील जळमटे वाढत जातात  हरेक  प्रश्नागणिक
या जगण्याच्या रंगीन अभासात.
तरीही पडत राहतो,
अभावग्रस्त योजनांचा महापूर वाढत जातो
तोल गेलेल्या  बेताल जगण्यात
निराशेची जंगले वेढत वेढत
हातबलतेत भर टाकत राहतात,
भरभर भरभर.
उरभर पोसलेली स्वने
अभावग्रस्त जमणीसारखी करपून जातात
या समग्र कोलाहलात

Comments

Popular posts from this blog

सोशल मिडीया वाचक व अभिरुची (लेख)

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरीविश्व (लेख)