Posts

Showing posts from June, 2020

मेंदूतील भीती

Image
जाळे लावून बसलेली माणसं पकडत राहतात निरपराध माणसांना स्वार्थाच्या हव्यासाने जपत जपत जगणाऱ्याची घुसमट सिगेला पोचतेय ही जळमटे वाढत जातात जगण्याचा ताळमेळात स्वच्छ निरर्भ जगणे कोलमडून जाते भ्रमनिरासात अवघे आकाश या कोलाहलात कुठे मोठयाने बोलायचे नाही स्व गुंडाळून जगायचे आत्मभान वगेरे गोष्टीरुप म्हणायच्या कुनापुढे

भीती मेंदूत

जाळे लावून बसलेली माणसं पकडत राहतात निरपराध माणसांना स्वार्थाच्या हव्यासाने जपत जपत जगणाऱ्याची घुसमट सिगेला पोचतेय ही जळमटे वाढत जातात जगण्याचा ताळमेळात स्वच्छ निरर्भ जगणे कोलमडून जाते भ्रमनिरासात अवघे आकाश या कोलाहलात कुठे मोठयाने बोलायचे नाही स्व गुंडाळून जगायचे आत्मभान वगेरे गोष्टीरुप म्हणायच्या कुनापुढे 

आपलेपण

Image
जोरात धडकते अंतःकरण आपण कोणत्या बाजूला उभे आहोत हे आपल्या नजरेत आल्यावर हादरून जातो आपण आपल्या आतूनच काळाच्या वारूवर बेभान स्वार झालेले आपण कोणत्या पातळीला घसरून गेलोय काळ्यामिट अंधाराच्या विशाल पदरात माणसं भेदरून गेलीत माणसांच्या खच्चून भरलेल्या गर्दीत प्रत्येकजण अविश्वासाने पाहतोय स्वतासकट गर्दीकडे हव्यास भरून उरलाय सभोवताल आमिषाने बाटवून टाकलंय आपलेसे केलेय माणसातील स्वार्थाला ही जगण्याची धरपकड हवालदिल झालेला माणूस संशयाने पाहतोय सभोवताल थरथरत्या अंतकरणाने कधी आपला नंबर लागेल आणि कधी होईल कडेलोट याचा अंदाज घेतोय या सरसावल्या टोळधाडीच्या हल्याचा घाबरलेल्या तुटलेल्या धडधडणाऱ्या अंतकरणाने तू सदैव उभा पाठीराखा असल्यासारखा माझ्या खऱ्या खोट्याच्या न्यायात सगळेच व्यवहार तुझ्या साक्षीने बांधलेले भाळावार माझी नीती माझे डावपेच युध्दणीती सगळे बांधील तुझ्यात पण सगळे तू करतोस बेदखल स्वतःचे अंग वाचवून स्वता नवा कोरा राहून

यंत्र

Image
यंत्राने खाल्लेला माणूस हतबल होऊन कचऱ्यात पडलाय स्वतःच डिलीट ऑप्शन वापरल्यासारखा स्क्रीनमध्ये अडकलाय तो मोबाईल पीसी लॅपटॉप अनेक रंगबेरंगी स्वतःच अस्तिव गुंतवून त्याने करून घेतलाय बद्दल यंत्रासारखाच स्वतःत भावना विचार याचे नाते जोडून घेतलीय माणूस हद्दपार केलाय स्वतातून आजूबाजूच्या यंत्रात सामावून घेतले स्वतःला

वारी वाळवंटात लोकशाही

Image
माझा वाजू दे मॄदंग तुझ्या रोज भजनाला मग राहिल अभंग भक्तीच्या कासेला सांज झुकेल रात्रीला मन राहिल प्रसन्न गंध येतच राहिल दंग झालेल्या मनाला तुझे रोजचे चिंतन मग येईल तनात टाळ वाजत राहील आत मनाच्या गाभ्यात माझा ज्ञानोबा राजा तुका येईल धावत मुक्ता जना बहिणाई फेर धरून नाचेल.
अंधाराच्या पखाली वाहणारे भोइ म्ह्णून सतत वावरणारे आम्ही देशाचे तरुण भाकरीच्या तुकड्यासाठी लढाई करणारे या देशातील अलौकिक योद्धे पदाव्यांचे ओझे वाहणारे पदवीबहाद्दर फसव्या आश्वासनाचे झालोत आम्ही भूकबळी यातणाचे हुकमी एक्के आकाशाचं व्याप्तपण आपल्यात सामावण्यासाठी आम्हाला आमचा आत्मा एखादया समाजसुधारकाला विकावा लागणार आहे तयारी म्हणजेच आत्मे विकणे आहेत.

हव्यास

टोकाचा हव्यास दुसऱ्याला नागव करून स्वतः नटनारी प्रवृत्ती जन्माला येतेय स्वतःच्या भातावर डाळ ओढण्याची स्पर्धा लागलीय माणसाला वस्तू बनवणीच्या काळात पलीकडील झोपडीतील माणसाची झोपडी हरवतेय बंगल्याच्या हव्यास असणाऱ्या पालिकडील शेजाऱ्याला हा न संपणारा हव्यास जगण्यात मोठे होण्याच्या मारंगात कोणत्याही थराला जाणारा स्वार्थानंद
आकाशातील तारा तुटताना काय मागशिल? ओघळणाऱ्या अश्रूसांठी काय मागशिल? वेडया आत्म्यासांठी काय मागशिल? मागणाऱ्या याचकासाठी काय मागशिल? तहानलेल्या चातकांसाठी काय मागशिल? झोपलेल्या भुकेल्यासाठी काय मागशील? उन्हातान्हात राबणाऱ्या हतासाठी काय मागशील? हव्याशी आत्म्याला काय मागशील? अखंडपणे मागत मागत थकलेल्याला काय मागशील?
बेरोजगारांचे थवेच्या थवे सभोवताली रेंगालताना आम्ही पदव्या घेत राहतोय आमच्या उज्वल भवितव्यासाठी अश्या या बेताल वातावरणाच्या या भितीदायक विभत्स शहरात मी जातोय खोल खोल आत पर्यंत आपल्याच विनाशाच्या मस्तीत काहीही रूतुन राहत नाही सारच कस उथळ उघड वागड किळस आणणार माझ्यातूनच मला बाहेर काढणार जस काही वाळूत  मुत्र विसर्जनासारख स्वप्नांना लपवित जाणारं. अमूर्तच्या गर्तेतून आत्मनाशाकडे  अनादी अनंत काळाकडे झेपावणाऱ्या मृत्यूकडे

अराजक

आजूबाजूला चाललेला जात धर्म वंश यांच्या कात्रीत कुडत कुरतडत जाणारा माणूस वाट पाहतोय स्वतःच्या आत्मभानाची स्वतःचा हरवला चेहरा शोधतोय  इतिहासाच्या सत्यासत्यतेत हे विष अंनंतकाळात शोधतोय मिरा विष पचवते सॉक्रेटिस विषाने मरतो राजे संभाजी विष ओळखतो आता प्रत्येकाच्या विषाची रित ओळखता ओळखत नाही विषातील जहालता लयास जाते कि, विकली जाते याचाच शोध विष स्व:ता घेतय.