अंधाराच्या पखाली वाहणारे भोइ म्ह्णून
सतत वावरणारे आम्ही देशाचे तरुण
भाकरीच्या तुकड्यासाठी लढाई करणारे
या देशातील अलौकिक योद्धे
पदाव्यांचे ओझे वाहणारे
पदवीबहाद्दर
फसव्या आश्वासनाचे झालोत आम्ही
भूकबळी यातणाचे हुकमी एक्के
आकाशाचं व्याप्तपण
आपल्यात सामावण्यासाठी
आम्हाला आमचा आत्मा
एखादया समाजसुधारकाला
विकावा लागणार
आहे तयारी
म्हणजेच
आत्मे विकणे आहेत.
Comments
Post a Comment