Posts

Showing posts from July, 2020

आभास

Image
थकलेल्या जिवा काडीचा आधार लटकला जीव आशेपाई डोळ्यातील आशा मूठभर मांस कोलमडे जीव अंधारात आभासी जगाचा समजेना कल समजेना अर्थ जगण्याचा करपल्या आशा उराशी निराशा जगण्याचा मार्ग खोळंबला स्वनाचे गाठोडे सदा साथ देई उघडे वास्तव जीव घेई कोरडा उमाळा दाटून राहिला आसपास स्वार्थ बोकाळला कुणाच्या डोळ्यात दाटल्या सावल्या मायेचे आभाळ गडुळले

माणसाचे मशीन

Image
हे न थकणारे मशीन किरणातूनच पसरत जाणारे संकटाचे सावट थेट चादारीच्या आतपर्यंत उसंतच घेऊ देत नाही जगण्यासाठी असे हजारो मार्ग नाउमेद करणारे सकाळीच प्रश्न पडलेले समोर हात पसरवून चहापाण्याचे पोटभर खाण्याचे पोराटोरांच्या सुखांचे आजारपणाचे आणि असंख्य गुंतावळीचे  जगण्यातील जळमटे वाढत जातात  हरेक  प्रश्नागणिक या जगण्याच्या रंगीन अभासात. तरीही पडत राहतो, अभावग्रस्त योजनांचा महापूर वाढत जातो तोल गेलेल्या  बेताल जगण्यात निराशेची जंगले वेढत वेढत हातबलतेत भर टाकत राहतात, भरभर भरभर. उरभर पोसलेली स्वने अभावग्रस्त जमणीसारखी करपून जातात या समग्र कोलाहलात

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरीविश्व (लेख)

Image
पारंपरिक धार्मिक मूल्यांना छेद देणारे ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचं जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूनं नि निष्ठेनं मी चित्रित करणार आहे नि करीत आहे.’ हे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस, वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणाऱ्या व आपल्या वरील विधानाप्रमाणे दलित-शोषित कष्टकरी चळवळीसोबत एकनिष्ठेनं राहणाऱ्या लोकशाहीर, साहित्यिक कॉम्रेड अण्णाभाऊ हे कामगार-कष्टकऱ्यांच्या चळवळीचे लोकशाहीर म्हणून अधिक नावाजले. तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी  कुरुंदवाड संस्थानातील वाटेगाव ता.वाळवा, जि. सांगली येथे झाला. गावाच्या बाहेरील वस्तीतील एका छपरात अण्णांचा जन्म झाला. अण्णाची आई वालुबाई भाऊराव साठे आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णाभाऊंवर होती. तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. अण्णाभाऊ पहिल्यांदा व...

गावागाड्याचा बदलता अवकाश (पुस्तक परिचय)

Image
खाजगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण या खाऊजा च्या परिणामाने जगाबरोबरच भारतातही खूप उलथापालथ झालेली दिसून येते. पारंपरिक स्वरुपाची कुटुंब आणि गावपद्धती एकदम कालबाह्य ठरली. खरेदी विक्रीच्या ऑनलाइन पद्धती या आमच्या जगण्याचा आविभाज्य भाग झाल्या आहेत खाण्यापिण्याचे, मनोरंजन आणि अन्य स्वरूपाचे सारे रीतीरीवाजही बदलले. तंत्रज्ञान वेगानं आलं. डेस्कटॉपकडे नवलाईनं पाहणारी माणसं बघता बघता इंटरनेट, मोबाईल वापरू लागली. गुगल, युट्यूब आणि एकूणच इंटरनेट हे माहितीची आणि ज्ञानाची नवी माध्यमे आपल्या हातात आली. सीसीटीव्ही, मोबाईल कॅमेरा आणि या स्वरूपाच्या अन्य साधनांनी कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. यातून संपत जाणारी ‘प्रायव्हसी’ खरेच या अर्थाने आता आपण ग्लोबल व्हिलेजचे गावकरी झालो आहोत. जगायच्या नव्या पद्धती अंगी बानवून शहराप्रमाणे निमशहरी भागातही या सगळ्या बदलाचे पडसाद उमटलेले दिसतात. काळाच्या स्थित्यंतराचे बिनचूक आकलन असलेले व समकालीन काळाचे सहप्रवासी बालाजी सुतार कवी-लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी नियतकालिकांतून मोजक्या परंतु अभिजात अशा कथा लिहून कथाकार म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेली आहे. त्यांच्...

सोशल मिडीया वाचक व अभिरुची (लेख)

Image
मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच ठिकाणी ऐकावयास मिळते. माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन केल्याने ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. हे लक्षात घेतले तरच वाचन संस्कृती वाढावयास मदत होईल. टीव्हीचा वाढता प्रभाव, सोशल मीडिया साइट्स, इंटरनेट, या माध्यमामुळे तरुणाईबद्दल वाचनाविषयी फारच काळजीचे वातावरण आहे. आता तर इंटरनेटचा वापर मोबाइलसारख्या सोप्या माध्यमाद्वारे करू लागले आहेत. इंटेरनेटच्या पाठीवरून आलेल्या व त्यांनी दिलेल्या व्यक्त व्हायची संधीतून सोशल नेटवर्किंग वाढत गेले. जगाच्या कानाकोपऱ्यातील मंडळी एकमेकांशी संवाद साधू लागली. वेगवेगळ्या आवडी, छंद आणि इतर औत्सुकतेच्या विषयांनुरूप हे ग्रुप,गट वाढत जात आहेत. तंत्रज्ञानाची क्रांती एकविसाव्या शतकात जन्मलेल्या जवळपास प्रत्येकाला मोबाइल तंत्रज्ञानासोबत इंटरनेट उपलब्ध असणे ही फारच क्रांतिकारक सोय निर्माण झाली आहे. प्रत्येक मोबाइलधारक हा शब्दशः महाभारतातील संजयाइतका पारंगत होत आहे. “इंटरनेट आणि ‘ई-बुक’ यांनी आज वाचनालय...