आभास
थकलेल्या जिवा
काडीचा आधार
लटकला जीव
आशेपाई
डोळ्यातील आशा
मूठभर मांस
कोलमडे जीव
अंधारात
आभासी जगाचा
समजेना कल
समजेना अर्थ
जगण्याचा
करपल्या आशा
उराशी निराशा
जगण्याचा मार्ग
खोळंबला
स्वनाचे गाठोडे
सदा साथ देई
उघडे वास्तव
जीव घेई
कोरडा उमाळा
दाटून राहिला
आसपास स्वार्थ
बोकाळला
कुणाच्या डोळ्यात
दाटल्या सावल्या
मायेचे आभाळ
गडुळले
काडीचा आधार
लटकला जीव
आशेपाई
डोळ्यातील आशा
मूठभर मांस
कोलमडे जीव
अंधारात
आभासी जगाचा
समजेना कल
समजेना अर्थ
जगण्याचा
करपल्या आशा
उराशी निराशा
जगण्याचा मार्ग
खोळंबला
स्वनाचे गाठोडे
सदा साथ देई
उघडे वास्तव
जीव घेई
कोरडा उमाळा
दाटून राहिला
आसपास स्वार्थ
बोकाळला
कुणाच्या डोळ्यात
दाटल्या सावल्या
मायेचे आभाळ
गडुळले
Comments
Post a Comment