अराजक
आजूबाजूला चाललेला जात धर्म वंश यांच्या
कात्रीत कुडत कुरतडत जाणारा माणूस
वाट पाहतोय स्वतःच्या आत्मभानाची
स्वतःचा हरवला चेहरा शोधतोय
इतिहासाच्या सत्यासत्यतेत
हे विष अंनंतकाळात शोधतोय
मिरा विष पचवते
सॉक्रेटिस विषाने मरतो
राजे संभाजी विष ओळखतो
आता
प्रत्येकाच्या विषाची रित
ओळखता ओळखत नाही
विषातील जहालता लयास जाते कि,
विकली जाते
याचाच शोध विष स्व:ता घेतय.
कात्रीत कुडत कुरतडत जाणारा माणूस
वाट पाहतोय स्वतःच्या आत्मभानाची
स्वतःचा हरवला चेहरा शोधतोय
इतिहासाच्या सत्यासत्यतेत
हे विष अंनंतकाळात शोधतोय
मिरा विष पचवते
सॉक्रेटिस विषाने मरतो
राजे संभाजी विष ओळखतो
आता
प्रत्येकाच्या विषाची रित
ओळखता ओळखत नाही
विषातील जहालता लयास जाते कि,
विकली जाते
याचाच शोध विष स्व:ता घेतय.
Comments
Post a Comment